Skip to main content

Posts

Showing posts from April 9, 2018

१० एप्रिल १७५५ होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हानेमान यांचा जन्म दीवस

होमिओपॅथी संपूर्ण जगाने मान्य केली अाहे .  दुर्धर राेगही समूळ नष्ट हाेतेा , असा विश् ‍ वास प्रत्येकाला अाला आहे . हे सगळे हेाउ शकले होमिओपॅथीचे महान जनक डॉ . हॅनेमन यांच्यामुळे   अाज त्यांचा जन्म दिवस .   होमिओपॅथीचे महान जनक डॉ .  हॅनेमन   यांच्यामुळे     अाज त्यांचा जन्म दिवस .  1790  मध्ये ‘ कुलेन्स   मटेरिया   मेडिका ’  या   पुस्तकाच्या   अनुवादाचे   कामकरताना पेरुवियन   बार्क   या   झाडाची   साल   मलेरियावर   गुणकारी   वया   सालीपासून   औषध   तयार   येते अशाी माहिती  होती. त्यानुसार त्यांनी औषध तयार करून स्वत:वरच प्रयोग केला असता    आजारी   पडले . डॉ .  हानेमन   यांच्या   लक्षात   आले   की ,  त्यांच्या   आजाराची   लक्षणे   आणि   मलेरियाची   लक्षणे   यातसारखेपणा होता .  औषधे बंद केल्यावर लक्षणे सुद्धा कमी झाली.   त्यानंतर ...

अनेक रोगांना आमंत्रण देते अ‍ॅसिडिटी

तुम्ही ऑफीसमध्ये असाल किंवा कुठेही नोकरी करत आहात तेथे दोन ते तीन जण तरी आपल्याला अ‍ॅसिडिटी झालेले भेटतीलच कारण ही समस्या आता सर्वांपर्यंत पोहचलेली आहे. त्याचे कारण बैठे काम, तळलेले पदार्थ खाने, व्यायामाचा अभाव, अवेळी जेवन अशी अनेक कारणांनी अ‍ॅसिडिटीच्या समस्या उद्भवतात. अ‍ॅसिडिटीकडे दुर्लक्ष करणे हे शरिरासाठी अतिशय घातक ठरू शकते. अ‍ॅ सिडिटी ही पचनक्रीयेशी संबंधित समस्या आहे. पोटातील अ‍ॅसिड हे तोंडाकडे परत येते त्यामुळे तोंडात आंबट पाणी येते. कधी कधी आपण आवश्यकेपेक्षा जास्त प्रमाणात जेवण करतो, ते जास्तीचे जेवण म्हणजे गॅसचे कारण, पोट भरल्यावर जास्तीचे अन्न हे वर येते. त्यामुळे ते पचन न होता गॅस तयार होते. अ‍ॅसिडिटीच्या समस्या ह्या बर्‍याच वेळा जेवण झाल्यावर जास्त प्रमाणात दिसून येते. ज्यांचे वजन जास्त आहे, जेवन झाल्या बरोबर झोपतात, तेलकट पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात करतात, नेहमी मद्यपान करणारे, तान तनावात राहणार्‍या व्यक्तींना अ‍ॅसिडिटीची समस्या जास्त प्रमाणात आढळून येतात. खाण्याच्या सवयी, धुम्रपान, आहार, तणाव आणि अल्कोहोल सेवन, शारीरिक हालचाल यांची अनियमितता यासारख्या अनेक बाह्य...

कॉम्प्युटरवर काम तर आपले डोळे सांभाळा

कॉम्प्युटर हा आपल्या जिवनावश्यक गरजपैकी एक झाला आहे. कारण त्याशिवाय कोणतेही काम होत नाही. आज प्रत्येक कामाच्या ठिकाणी कॉम्प्युटर आले आहेत. त्याचबरोबर नियमितपण 8 ते 10 तास कॉम्प्युटर स्क्रिनच्या पुढे बसून असावे लागते. त्यामुळे त्याचा आपल्या डोळ्यावर परिणाम तर होणारच. डोळे शुष्क पडणे, डोळे ताठरल्यासारखे होते. काही वेळाने अंधारल्यासारखे होणे. असा परिणाम आपल्याला दिसून येतो. याकडे जर आपण दुर्लक्ष केले तर त्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. त्यासाठी कॉम्प्युटरवर काम करतांना थोड्या थोड्या वेळेने ब्रेक घ्यावा, काही वेळाने थोडे पाणी डोळ्यांना लावावे, तज्ज्ञांच्या पाहणीत असे आढळून आले की सर्वात जास्त डोळ्यांच्या समस्या ह्या कॉम्प्युटरवर जास्ती जास्त काम करणार्‍या व्यक्तींना आल्या आहेत.

जाणून घ्या लसूनचा गुण

लसूनचा उपयोग आपण आपल्या जेवणामध्ये चव व रूचकरपणा यावा यासाठी करतो. पण लसून आपले आरोग्यासाठी महत्वाचा म्हणजेच अमृतासारखा आहे. लसून अनेक रोगापासून दूर ठेवतो. आयुर्वेदानुसार लसून आपल्याला चिरतारूण राहण्यास मदत करतो आणि कॅन्सर, सर्दी, पोटदुखी, चक्कर येणे आणि पचक्रियेसाठी औषधासारखे काम करतो. जर दात दुखत असतील तर लसूनची एक पाकळी पीसून ते दाताला लावा लसूनाचे औषधी गुणधर्म तेथील दुखने कमी करते. पोटदुखीवरसुद्धा त्याचा उपयोग केला जातो. आतासुद्धा गावामध्ये लसून आणि हळद याची गोळी करून मुलांना देतात. लसून आणि शहद यांचे मिश्रण करून खाल्ल्याने ह्ृदयापर्यंत जाणार्‍या पेशीं साफ होउन ब्लड सर्कुलेशन व्यवस्थि होते. औषधी मूल्ये • सर्दी • घशातील इन्फेक्शन • डोळे येणे • हाय कोलेस्ट्रॉल • हाय ब्लडप्रेशर पौष्टीक मूल्ये • विटामिन बी 1 • एलिकिन नॅचरल एंटीबायोटिक • भरपूर मिनरल

नेहमी राहील चेहर्‍यावर ‘ग्लो’

प्रत्येकाला वाटते की आपल्या चेहर्‍यावर नेहमीच तेज असावे, आपण सगळ्यांत उठून दिसले पाहीजे. यासाठी आपण नेहमीच सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी रासायनिक क्रीमचा अतीवापराने आपल्या चेहर्‍यावर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यासाठीच काही घरचेच उपाय करूया. चे हर्‍याला चमकण्यासाठी दिवसातून दोन वेळा चेहरा पाण्याने स्वच्छ करा. शक्यतो केमिकलचा वापर कमी करा. पाण्याच्या गुळण्या करा. त्यामुळे चेहर्‍याचा व्यायाम होतो. जास्तीत जास्त पाणी प्या, पाण्याने आपल्या शरीरातील हानीकारक घटक घामाद्वारे बाहेर फेकल्याने त्वचा स्वस्थ राहते. दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी प्या. आपल्या चेहर्‍याला सूर्यकिरणांपासून वाचवा, त्यामुळे चेहर्‍यावर मुरूम, पुटकुळ्या, डोळ्याच्या खाली काळे डाग पडतात. जर आपल्याला बाहेर जायचेच असेल तर, चेहर्‍याला रूमाल बांधा, सनस्क्रीम, हेल्मेटचा वापर करा. दर रोज चंदन पावडर, गुलाब जल व हळद यांचे मिश्रणाचा लेप तयार करुन चेहर्‍यावर लावावा त्यामुळे चेहर्‍यावरचा ग्लो वाढले. चेहर्‍यावरील काळ्या डागांसाठी कोरफळ अतिशय गुणकारी माणले जाते. कोरफळच्या पत्त्यांच्या आतील गर काढून काळ्या डागांवर लावावा त...

ऑईल फ्री भाजलेल्या वांग्याचे भरते

ऑईल फ्री भाजलेल्या वांग्याचे भरते आणते जीभेला चव आणि रूचकरपणा स्वस्त आणि मस्त घरीच करा वांग्याचे भरते वां गे फार सामान्य दिसणारी भाजी आहे. पण त्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही की वांगे हे हृदयासाठी आरोग्यदायी आहे. त्यामुळे कोलेस्ट्रालची मात्रा कमी होउन हृृदयासाठी उपकारी ठरतो. वांग्याचे सर्वात जास्त उत्पन्न हे चिनमध्ये होते तर दुसरा क्रमांक हा भारताचा लागतो. वांग्याचे वेगवेगळे प्रकार येतात. भरित करण्यासाठी मोठ्या वांग्याचा उपयोग करावा त्यामध्ये पांढरे आणि जांभळ्या रंगाचे प्रामुख्याने बाजारात मिळतात. वांग्याचे भरीत तर थोरामोठ्यांना आवडीचे आहे. त्यातही ते जर तेल न वापरता केले तर जे डायट करतात किंवा जास्त तेल खात नाहीत त्यांना तर फारच आवडेल. वांग्याचे भरीत हे खेड्यापासून तर शहराच्या स्वयंपाक घरापर्यंत मर्यादित राहीले नाही तर. आता फाईव्ह स्टार होटेलमध्येही त्याने आपली जागा घेतली आहे. तर बघुया कशी तयार केली जाते वांग्याची रेसीपी. सर्वप्रथम आपण साहित्य लिहून घेवूया, वांगे मोठे-दोन, कांदे बारीक केलेले-1, टोमॅटो बारीक केलेले-1 किंवा 2, लसून- 1 चमचा पेस्ट केलेले, हिरवी मिरची 1 किंवा 2, ...

लहान चावा मोठा धोका डेंग्यू

ताप हा तसाही तापदायक असतोच, पण सामान्य ताप लवकर बरा होतो. काही ताप असे असतात की ते लवकर बरे होण्यासाठी खूप वेळ घेतात. तसाच ताप आहे डेंग्यू. या तापामुळे आपल्या शरिरात त्राण राहत नाही. हा ताप आपल्याला होउ नये म्हणून याची काळजी घेतलेली बरी...! डें ग्यूमुळे देशात मृत्यू होणार्‍यांची संख्या फार मोठी आहे. डेंग्यू हा डासांपासून संक्रमित होणारा रोग आहे. आपल्याला याला दूर ठेवता येवू शकते. फक्त हवी डेंग्यू बद्दल जागरूकता आणि गरज आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जेणे करून तेथे डासांची उत्पत्ती होणार नाही. डेंग्यू हा हवा, पाणी किंवा सोबत राहिल्याने किंवा सोबत जवेण केल्याने होत नाही, तर डेंग्यू अशवशी रशसूिींळ नावाच्या मादी डासांपासून होतो. जर एखाद्याला डेंग्यू झालेला असेल त्याला हा डास चावला तर त्याद्वारे डेंग्यू संक्रमित रक्त त्या डासाच्या शरिरात जाते आणि जेव्हा हा डेंग्यू संक्रमित डास निरोगी व्यक्तीला चावते तेव्हा त्याच्या शरिरात या डेंग्यूचे संक्रमण होते आणि त्या व्यक्तीला डेंग्यू होतो. हे डास दिवसा चावतात. या डासांच्या पायावर आणि शरिरावर पांढर्‍या रंगाचे पट्टे असतात. हे डास जास्त उंच उडू शकत ...

चेहर्‍यावर येणार्‍या पुटकुळ्या मुरूम

ईऽऽऽई चेहर्‍यावर मुरूम आता मी काय करू...! असा आवाज येतोच. चेहर्‍यावर मुरुम व पुटकळ्या येण्याची बरीच कारणे आहेत. वयात बदल होतात तेव्हा, तेलकट पदार्थाचे सेवन, उशीरापर्यंत जागरण करणे, त्वचा तेलकट असे अशी अनेक कारणे आहेत. त्यावर पुढे बघुया उपाय काय करता येतील. का ळजी करू नका मुरूम/पुटकुळ्या प्रत्येकालाच होतात. त्यातही वाढत्या वयात हार्मोन्स बदलतात तेव्हा तर जास्त प्रमाणात दिसून येतात. चेहरा तेलकट होवून चेहर्‍यावर बारीक पेशींवर थर साचून त्या ब्लॉक होतात. त्यामुळे चेहर्‍यावर मुरूम/पुटकुळ्या तयार होतात. त्यामुळे हे होउ नये यासाठी आपण केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधनांचा वापर करू नये. त्याचा विपरित परिणाम होउन चेहरा आणखी खराब होण्याची भिती असते. आपल्याला एवढेच करायचे आहे की, चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवावा. झाल्यास एकदा बेसण पीठ घेवून चेहरा धुवावा. तसेच कोरफडच्या पानांतील गर काढून त्यानेसुद्धा आपला चेहरा स्वच्छ करता येतो. असेही घरगुती उपाय आपल्याला खर्च न येता करता येताता. आरोग्यदायक आहार घ्यावा, पालेभाज्या, फळे, कडधान्ये खावीत. त्यासोबत व्यायाम करावा. यामुळे शरिरातील रक्तप्रवाह सुरळीत हो...

जाणून घ्या कांदयाचेही गुण

कांदा हा दोन प्रकारचा बाजारात मिळतो हिरवा आणि वाळलेला. जास्त वापरला जातो तो वाळलेला कांदा. कांद्यामध्ये असे अनेक आरोग्यवर्धक, मिनरल आणि व्हिटमिन आहेत. कांद्यामध्ये क्रोमनियम तत्व आहे जे शरिरातील अतिरिक्त साखरेचे प्रमाण कमी करून नियंत्रित करते. ब्लडप्रेशर, डायबेटीच्या रूग्णांनासाठी कांदा हा फायद्याचा आहे. कांद्या काद्यातील घटक • सल्फर • फ्लेवोनोइड्स • व्हिटॅमिन बी • व्हिटॅमिन सी • कॅल्सिअम • पॉटॅशियम • तांबा • फायबर • लोह चा सर्वात जास्त उपयोग उन्हाळ्यामध्ये औषधी म्हणून वापर केला जातो. उन्हाळ्यात उन जास्त असते त्यामुळे उन लागणे हे फार कॉमन असते. कांद्याचा रस काढून कानात, अंगाला , पायाला लावून उनाची उष्णता घालवली जाते. कांद्यामध्ये असलेले फ्लेवोनोइड्स आणि सल्फरमुळे कांदा हा औषधीसारखा काम करतो. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात कांदा असणे आरोग्याला हितकारी आहे.

नियमित चालण्याने वाढवा आपले आयुष्यमान

सगळ्यात सोपा व्यायाम म्हणजे चालणे. चालण्याला कुठलेही पैसे मोजावे लागत नाही. दररोज 30 मिनिटे चालले तर नक्कीच आरोग्य चांगले राहते. आज एकाच ठिकाणी बैठे काम करणे आणि धकाधकाची आयुष्य यामुळे अनेक रोगाना निमंत्रण आहेच. स्वत:कडे लक्ष देण्यासाठी कुणालाच वेळ नाही, शरिर स्वास्थ हिच खरी आपली संपत्ती आहे. तीला सांभाळणे आपली गरज नव्हे तर आवश्यक आहे. स्वास्थ चांगले तरच आपण कामे चांगले करू शकतो, कोणत्याही कामात यश संपादन करू शकतो. म्हणून स्वास्थ चांगले राहण्यासाठी सकाळचे 30 मिनिटे चालत रहा. सकाळी चालण्याचे फायदे खुप आहेत. सकाळच्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते. हाडांसाठी आवश्यक असलेले डि जीवनसत्व हे सकाळच्या कोवळ्या उन्हातून आपल्याला मिळते. सकाळच्या वातावरणामुळे मन प्रसन्न राहते. वजन कमी कराचे असेल तर चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे. चालण्याने आपल्या शरिरातील चरबीचे प्रमाण कमी होते. वेगात चालण्याचा फायदा हा आपल्या हृदयालाही होतो. चालण्याने पचनक्रिया सुधारते व मलबद्दधता, पोटाचे विकार कमी होतात. नियमित चालणार्‍यांमध्ये हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असते. चालण्याने पायांचे स्नायू म...

कॉम्प्युटरवर काम तर बसण्याची स्थिती सुधारा

कॉम्प्युटर काम करताना बसण्याची पण काही वेळा पाळाव्यात. कारण एकाच जागेवर बसून कंबरदुखी, मानदुखने अशा समस्या सुरु होतात. प्रत्येक अर्धा ते एक तासांनी विश्राम घ्यावा. जेणेकरून शरिरास थोडी हालचाल होईल. आपले बसण्याचे आसन म्हणजेच खुर्ची हि बसायला कम्फर्ट आहे की नाही पाहावे, खुर्ची व्यस्थित नसेल तर कंबरदुखी, पाठदुखी सुरु होते. कॉम्प्युटर स्क्रिन आणि आपल्या डोळ्यांच्या एका रेषेत किंवा थोडासा खाली असावा. थोडा मानेचा व्यायाम करावा, जर आपण एखादा डाक्यूमंट किंवा पेपरवरुन टाईप करत असाल तर पेपर स्टँडचा वापर करावा. कि बोर्ड आणि आपल्या हाताला सोपा जाईल असा ठेवावा. वर किंवा खाली ठेवू नये.

अतिसार/ डायरिया

प्रत्येक ऋृतू बदलला की, वातावरणात बदल होतो.त्याचा परिणाम लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना होतो. त्यात लहान मुलांची जास्त काळजी घ्यायची गरज असते. तर बघुया अतिसार (डायरिया) काय आहे. अ तिसार (डायरिया) यात शरिरातील पाणी आणि मिनरल निघून गेल्याने पोषण मिळत नाही. हा खाण्या पिण्याच्या पदार्थामधून शक्यतो होतो. प्रदूषित पाणी, फळे, अन्न हे याचे मुख्य कारण आहेत. अन्नाच्या किंवा पाण्याच्या यामाध्यमातून पोटात बॅक्टिरिया (जिवाणू)गेल्यावर त्याचे परिणाम दिसायला लागतात. या व्यतिरिक्तही अतिसाराची कारणे आहेत. जसे भेसळयुक्त दूध, दुग्धजन्य पदार्थ, कमी झोप. पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे अतिसार झाल्याचे प्रमाण जात असतेे. डायरियाची सुरुवात पोटात थोडे दुखणे सुरु होते नंतर त्याचे प्रमाण वाढते. संडास कधी घट्ट तर कधी पातळ होते. हात पाय दुखायला लागतात. अशक्तपणा येतो. मळमळ, उलट्या होतात. यामुळे शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होवून मृत्यू सुद्धा होउ शकतो. लहान मुलांना पाच पाच मिनिटांतून पातळ संडास होते. त्यामुळे त्यांच्या शरिरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. म्हणून त्यांची काळजी घ्यावी, ताबडत...

लहान लहान गोष्टीतून तनाव

तणाव हि अशी गंभिर समस्या आहे की, जी प्रत्येकाला नैराश्याकडे कधी ना कधी वळवते. त्याचा परिणाम होतोच. म्हणून तो तणाव आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने घालवता येतो. फक्त आपल्याला संयम राखावा लागतो. बघुया थोडक्यात आपण तणावाशी एक हाथ कसे करू शकतो ते...! त णाव म्हणजे आपल्याला हवी असलेली गोष्ट मनासारखी न घडने. तेथूनच तणावाला सुरुवात होते. ती मग छोटी असो वा मोठी. यात थोडा तणाव येतोच. तो 3 टक्के किंवा 10 टक्केही असू शकतो. तसे त्याला जर मोठी कारणे असली तर त्याची टक्केवारीही मोठीच असणार. आजचे स्पेर्धेचे युग आहे. धावपळ होते, त्यातून तणाव येतो असे म्हटले जाते. पण तशी परिस्थिती नसते. आपण त्या परिस्थितीकडे कोणत्या दृष्टीने पाहतो हे महत्वाचे आहे. आपला तणाव घालवण्यासाठी मनाला एकाग्रतेची खुप आवश्यकता असते. त्याकरिता रोज काही वेळा ध्यान धारना करावी, योगा, व्यायाम, सकाळी मॉर्निंग वॉक हे नियमितपणे करावी. त्यामुळे आपला तणाव दूर करण्यास मदत होईल. काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या आवाक्यात नसतात. त्या आपल्याकडुन होणार नाहीत. त्याचा ताण घेवून काहीच फायदा होणार नाही. त्याकडे लक्ष देवू नका. जर आपल्याकडून क...

जाणून घ्या मेथीचे गुण

मेथीच्या दाण्यांचे फायदे : साधारण पाच ते दहा दाणे दररोज खाण्याने शरिर निरोगी व स्वस्थ राहते. त्याचबरोबर रक्तदाब, अपचन, मुधुमेह, पायांचे दुखने अशा अनेक दुखणे कमी करते. लहान मुलांमधील जंताचे प्रमाण मेथीच्या दाण्यांच्या भुकटीने कमी करते. मेथीदाणे भिजवून अंकुरीत दाणे खावे. साधारणत: हिवाळ्यामध्ये मेथी आणि डिंकाचे लाडू करून सेवन करतात. महिलांमध्ये प्रसूतीमुळे शरिरातील हाडांचे दुखणे जसे कंबर, हात, पाय शरिरातील संपूर्ण जॉईंटचे दुखणे सुरु होते. मेथीच्या लाडूंमुळे वेदना कमी होते. असे बहूगुणी मेथी दाणे नेहमी खाणे चांगले आहे.

तांब्याच्या भांड्यातील पाणी ठेवी शरिराला निरोगी

आपल्याकडे देवाला तांब्याच्या भांड्यातील पाण्याने अंघोळ घातली जाते. हे खूप पूर्वीपासून चालत आलेले आहे. त्याचा विचार केला असता त्यात सायंटीफीक कारण दडलेले आहे, हे नक्कीच आहे. प्रत्येक क्षेत्रात जशा जुन्या वस्तू जाउन नवीन वस्तू येतात तशाच आपल्या घरात देखिल नवीन वस्तू आल्या आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर ब्लॅक अँड टिव्ही घ्या त्या जागी आता कलर टिव्ही, नंतर एलइडी, थ्रीडी टिव्ही आला. तसेच आपल्या किचनमधील जुनी भांडी सुद्धा बदलली. पूर्वी काही मातीची, काही पितळ,कासे, तांब्याची होती. त्याची जागा आता स्टेनलेस स्टिल, काचेची आता तर चक्क प्लास्टिकची भांडी आलेली आहेत. स्वस्त आणि दिसायला चांगली असल्याने प्रत्येक ठिकाणी यांचा वापर दिसतो. पूर्वी जुन्या जानत्या लोकांनी प्रत्येक भांड्याचा शरिराला होणारा फायदा बघून त्याचा वापर आपल्या किचनमध्ये केला असावा म्हणूनच जुन्या भांड्यांमध्ये नैसर्गिक गुणधर्म आढळतो. ज्याचा फायदा आपल्या शरिराला होतो. म्हणून काही वस्तू ह्या काळ बदलला तरी त्यांची जागा कायम राहायला हवी. पूर्वी औषधी कारखाने, डॉक्टर, मेडीकल नसायची सर्वकाही घरगुती किंवा आयुर्वेदीक जडी-बुटी, नैसर्गिक वन...

कॉम्प्युटरच्या ठिकाणी असावा पुरेसा प्रकाश

कॉम्प्युटरवर काम करताना थोडी काळजी घेतल्यास आपल्या शरिराला होणार्‍या समस्या दूर होतील. काम करताना डोळ्यांच्या पापण्या चालू बंद करा, काम करतेवेळी 20 ते 25 सेकंदांनी थोडे इकडे तिकडे बघा यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. कॉम्प्युटरवर काम करताना आजू बाजूला पुरेसा प्रकाश असावा जेनेकरून कॉम्प्युटरचा प्रकाश आपल्या डोळ्यांवर पडणार नाही. एकसारखे बसू नका थोडे उठा किंवा मान उजवी डावीकडे करा. असे करण्याने आपली एनर्जी तर वाढतेच, कामाचा वेगपण वाढतो. यामुळे आपल्याला कंटाळवाणे वाटणार नाही.

मायग्रेन

आज प्रत्येकालाच सर्वात पुढे जायचे आहे! त्यामुळे प्रत्येक जणंच एकमेकांच्या पुढे धावत आहे. त्यामुळे टेंशन, आहाराचा अभाव, व्यायाम अशा शरिराला आवश्यक असणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आपले आरोग्य बिघडून आजारांना आमंत्रण देतो. आरोग्य सुदृढ राहावे म्हणून त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आ जार कोणताही असो, तो पूर्वीच ओळखून आपण त्याला नियंत्रणात आणू शकतो. त्याची लक्षणे ओळखून डॉक्टरांकडून योग्य उपचार करून तो कायमचा घालवू किंवा त्याची तीव्रता कमी करू शकतो. असाच आजार आहे मायग्रेन. यामध्ये असह्य अशी डोकेदुखी होते. मायग्रेनमध्ये थोड्या थोड्या वेळाने डोक्याच्या एका बाजूने असह्य अशा वेदना होतात. त्या काही तासांपासून ते दोन-तीन दिवसापर्यंतही राहू शकतात. यामध्ये आवाज, तीव्र प्रकाश सहन होत नाही, चक्कर येतात, उलट्या होतात, अशक्तपणा, एकच प्रतिमा तीन-तीन दिसतात. ही लक्षणे मायग्रेनची असू शकतात. असे झाल्यास त्वरीत डॉक्टरला दाखवावे. याची टाळा-टाळ केल्यास ब्रेन हॅमरेजचा धोका संभवू शकतो. ज्यांना शुगर, ब्लडप्रेशर आणि जे नेहमी मानसिक तनावामध्ये असतात अशांना मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता जास्...

मुलतानी माती

आज बाजाराध्ये अनेक फेसवॉश विक्रीसाठी आहेत. ते वापर केल्यावर चेहेरा लगेच उजळतो पण जास्त वापराने त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. निसर्गाने आपल्याला नैसर्गिकच सौदर्य प्रसाधने दिली आहेत. फक्त त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे माहित असणे आवश्यक आहे. मुलतानी मातीमधे शोषण्याचा नैसर्गिक गुणधर्म असल्याने प्राचिन काळात चेहर्‍यावर लावण्यासाठी उपयोगात आणली जात होती. तसा आजही त्याचा वापर होताना दिसून येतो. मुलतानी माती चेहर्‍यावर लावल्याने कोणताही साईडइफेक्ट न होता चेहरा कोमल होतो. मुलतानी माती लावल्यानंतर हळू-हळू घट्ट होउन ती कडक होते. ती चेहर्‍यावरील मृत कोशीका व अतिरिक्त तेलाला शोषून घेते. मुलतानी मातीचा फेसवॉश घरच्या घरी तयार करू शकतो. मुलतानी मातीचे 4 ते 5 चमचे त्यामध्ये दही 2 चमचे, लिंबू रस अर्धा चमचा, थोडीशी हळद यांचे मिश्रण करून 20 ते 25 मिनिटांपर्यंत ठेवा, नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून स्वच्छ करा. खासकरून ज्यांचा चेहरा तेलकट आहे त्यांचासाठी तर हा अनोखा उपचारच आहेत. तेलकट चेहर्‍यावरील तेल शोषून स्वच्छ करतो. त्याचबरोबर चेहर्‍यावरील मुरूम, पुटकुळ्यांपासूनही सुटका मिळते. अशा या मुलतानी...

सर्दिवर गुणकारी आहे हळद आणि आले

सर्दी काही मोठा आजार नाही, पण ती आपल्याला हैराण करते. असे वाटते की सर्दी होउच नये. पण ती कोणालाच सोडत नाही. त्यावर घरगुती उपायही बरेच आहेत. ज्याने आराम पडतो. त्यातील एक आहे आले हे बारीक करून एक कप गरम पाणी घेवून त्याला उकळू द्या त्यानंतर ती प्या. दुसरे आहे हळद, दूध गरम करून त्यामधे हद मिसळून ते ढवळून घ्या आणि गरम गरम प्यावे यानेसुद्धा सर्दीला आराम मिळतो. त्याबरोबर लवंग, हळद, मिरे (1 किंवा2) गरम पाणी घेउन उकळावे यांचा काळा करून प्यावे. यामुळे आपल्याला सर्दीपासून आराम मिळतो. असे घरगुती उपाय आपल्याला नेहमीच उपयोगी पडतील.

दातांची काळजी न घेतल्याने होईल हे नुकसान

आपण तसे पाहता रोज ब्रश करतोच हे आता सांगायची गरज नाही. टीव्हीवर जाहिरात पाहून आपण तेच प्रॉडक्ट घेवून ब्रश करतो. त्यातून चांगले वाइट पेस्ट किंवा ब्रश हे लवकर आपल्याला समजत नाही. आपण निवडलेल्या ब्रशमुळे दातांमधून रक्त आले, दुखायला लागले तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ब्रशची निवड करावी. ब्रश करताना ब्रश प्रत्येक कोपर्‍यात जावून साफ करेल आणि हा ब्रश हळू हळू करावा, घाई घाईने केलेला ब्रश दांताना योग्य पद्धतीने साफ करू शकत नाही. त्यामुळे दातांनासुद्धा इजा होउ शकते. वेगाने ब्रश केल्याने काही भाग सुटतो त्यामध्ये अन्नाचे कण अडकलेले राहतात. नंतर तोंडामध्ये दुर्गंधयुक्त वास येतो. दातांच्या आणि शरिराच्या आरोग्यासाठी तंबाखू, गुटखा यांचे सेवन करू नये, सर्वात जास्त दातांना नुकसान यामुळे होते. हे दातांना बाहेरून आणि आतमधुन कमजोर करताता. दात सडून त्यामध्ये पू सुद्धा होउ शकतो. तंबाखू, गुटख्याने कँसर होतो हे तर आता सिद्धच झाले आहे. चहा आणि कॉफीमध्ये असलेल्या फॉस्फरसमुळे शरिरातील कॅल्सियम कमी करते. त्यामुळे आपल्या दातांमध्ये ठणक, रक्त येणे असे बरेच विकार जडण्याची शक्यता असते. म्हणून कॉफी किंवा ...

फॅशन की दुनिया का वेब पोर्टल

आप https://www.fashion101.in इस वेब पोर्टल मे अभी कौनसा फॅशन ट्रेंड चल रहा है इसकी जानकारी देखोगे, फॅशन के साथ साथ इस वेब पोर्टल मे ब्युटी, मेकअप, फिटनेस की भी जानकारी दी गयी है, Celeb Fashion, Wedding, Beauty,Jewelry,fitness के व्हिडीओ भी दिखाये जाते है. आप नये नये फॅशन के पसंदीता है तो आपको ये वेब पोर्टल पसंत आयेगा और आप फॅशन डिझाईनर है तो अपना टॅलेंट बढाने आपकी काफी मदत हो जायेगी.

आपके घर के ड्रिम प्राजेक्ट मे मदतगार वेब पोर्टल

आप https://www.goodhomes.co.in ये वेब पोर्टल मे आपको घर के डिझाईन से लेकर Colour Schemes, Looks & Trends, Style, Living rooms, Bedrooms, Kitchens & Bathrooms के बारे मे मदत मिलेगी. ये पोर्टल आपके घर के ड्रिम प्राजेक्ट मे मदतगार और नयी आयडीया मिलेगी. पोर्टल मे होम डेकोरेशन के बारे मे लिखे आर्टीकल से भी आपको लाभ मिलेगा

फोटो के लिए pexels.com वेब पोर्टल

आप https://www.pexels.com pexels वेब पोर्टल मे बेहतर से बेहतर फोटोग्राफ आपके लिए उपलब्ध है. अलग अलग कॅटेगेरी night, black and white, animals, people, industry, group many more photos मे आप अपने लिए फोटोग्राफ ढुंड सकते है, आप फोटोग्राफी के शौकिन है तो यहा पर नये नये कंटेंड के फोटो भी लोड करने का ऑप्शन दिया है. (सूचना : हर website मे अपनी नियमावली है, हम सिर्फ आपको जानकारी देते है. बदलते रूल्स के नुसार वो बदल जाती है, इसलिए आप हर website के रूल्स ध्यान से पढे ).

epaper web portal link

epaper.jagran.com epaper.bhaskar.com epaperlokmat.in epaper.esakal.com epaper.divyamarathi.com epaperthetimesofindi.com epaper.thehindu.com amarujala.com deshonnati.in loksatta.com newspaper.pudhari epunyanagari.com

केळीपासून चिप्स : ईश्वरदास घनघाव यांची मिळकतीबरोबरच रोजगार निर्मिती

जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव. गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच. तथापि, शेतीला अन्य व्यवसायाची जोड देणे ही काळाची गरज बनली आहे. अत्यल्प शिक्षण, उद्योग, व्यवसायाचा अनुभव नसतानाही केवळ इच्छाशक्ती, चिकाटी व जिद्दीच्या जोरावर याच गावातील ईश्वरदास घनघाव यांनी शासनाच्या कृषी उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुदान घेऊन केळीपासून चिप्स बनविणारा प्रक्रिया उद्योग सुरु केला आहे. स्वत:बरोबरच इतरांनाही रोजगार देऊन त्यांनी वार्षिक 20 ते 25 लाख रुपयांची उलाढाल करणारा प्रक्रिया उद्योग सुरू करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. डोंगरराव येथील ईश्वरदास घनघाव यांना उद्योगाचे कुठलेही ज्ञान नव्हते. केवळ काहीतरी करुन दाखविण्याच्या जिद्दीने त्यांनी खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात या उद्योगाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तसेच मराठवाडा कृषी विद्यापीठातून फळे व भाजीपाल्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाचे संपूर्ण प्रशिक्षण घेऊन आपल्या शेतातच केळीवर प्रक्रिया करुन त्यापासून चिप्स बनविण्याचा उद्योग सुरु केला. या उद्योगामध्ये सुरूवातीला घनघाव यांना मोठ्या प्रमाणात अडचणी आल्...

बागलांची ट्रॅक्टर ट्रॉली… झाली ‘पेटंट’ची हकदार

‘कॉमर्स ग्रॅज्युएट’ व्यक्तीने एखादा इंजिनिअरींग व्यवसाय करावा, हे आपण समजू शकू. पण अशा व्यक्तीने इंजिनिअरिंग विषयातील पेटंट मिळवावे, हे आश्चर्यकारकच ! धुळ्याच्या औद्योगिक वसाहतीत किसान इंजिनिअरिंग वर्क्स या नावाने शतीउपयोगी अवजारांच्या निर्मितीत रममाण झालेल्या प्रकाश यांनी ट्रॅक्टर ट्रेलरच्या ब्रेकिंग सिस्टिममध्ये पेटंट नोंदविले आहे. त्यांच्या आजवरच्या वाटचालीबद्दल… ट्रॅक्टर चालविणे आणि त्याचे नियंत्रण ठेवणे हे मोठे अवघड काम. मुळातच हा अवजड आणि प्रचंड शक्ती असलेल्या यंत्राचा प्रकार, पाठीमागे लावलेल्या ट्रेलरमध्ये भरपूर माल भरुन जाणारे ट्रॅक्टर आपण नेहमीच पाहतो आणि भर वेगात असताना अचानक ब्रेक लावावा लागल्याने पलटी झालेल्या ट्रेलरची अवस्थाही आपण पहात असतो. असे अपघात टाळण्यासाठी सरकारने निर्णय घेत ट्रेलरला ब्रेक सिस्टिम बसविण्याचा आदेश काढला. ही गुंतागुंतीची प्रणाली धुळ्यातील किसान इंजिनिअरिंग वर्क्सचे प्रकाश बागल यांनी विकसित केली आणि त्याचे पेटंटही मिळविले. हे पेटंट सध्या सादर करण्यात आलेले असून त्याची सुयोग्य प्रक्रिया संपल्यानंतर ते रितसर प्रकाश यांच्या नावावर होईल, पण या पेटंटमु...

अभियंता पवार झाले ब्रिकेट उद्योजक

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन युवकांनी व्यवसायाला चालना दिल्याचे अनेक उदाहरणे आहेत. नोकरी करणे येवढाच पर्यांय नसून विविध क्षेत्रात भरीव काम करूनही समाधान मिळविता येते. त्यामुळे कोट्यवधीचे पॅकेज सोडून आपला व्यवसाय सुरु करण्याची, त्यातून इतरांनाही रोजगार उपलब्ध करुन देण्याची धमक युवा पिढीमध्ये आहे. असेच एक उदाहरण म्हणजे रत्नागिरी जिल्हयातील सुनिल महिपती पवार यांचे.. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने अशा मेहनती अभियंत्याला स्वत:चा उद्योग स्थापनासाठी प्रोत्साहन व सहकार्य दिल्यामुळे एका अभियंत्याला उद्योजक होता आले.या यशस्वी अभियंता उद्योजकांची ही यशकथा... अभियंता म्हणून कंपनीत अधिकारी असतानाही आपल्याला एक यशस्वी उद्योजक व्हायचंय हे पवार यांनी स्वप्न बाळगले. हेच स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्या अनुषंगाने वेगवेगळया उत्पादनाचा अभ्यास, इंटरनेटव्दारे आणि वेगवेगळया प्रदर्शनांना भेटी देऊन, वेगवेगळया उद्योगांविषयी चर्चा करुन घ्यायचा प्रयत्न सतत चालू होता. तुम्ही संधी शोधण्याची वाटचाल सुरु केलीत तर अनेक संधी सुध्दा तुमच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात करतात याची प्...

भविष्यासाठी जल बचतीचे उपचार करणारी खेडी आजपासून पुढील 45 दिवस अहोरात्र श्रमदान करणार

जल है तो कल है या उक्तीप्रमाणेच पाणी नसेल तर? असा विचार जरी आला तर मनात धडकी भरते. असा काळ आपल्या पुढील पिढीसाठी पर्यायाने आपल्यासाठी येणार नाही याची काळजी तर आपणालाच घ्यायला हवी. पाण्याविणा काय हाल होतात हे तर सगळ्यांनाच माहित आहे. याचे गांभिर्य लक्षात घेता, आता पाण्याचे महत्वही तेवढेच कळून चुकले आहे. गावागावातून पाण्याची साक्षरता होत आहे. यात मोलाचे काम करत आहे सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सामुहिक श्रमदानातून जलसंवर्धनाच्या कामांना तेल्हारा तालुक्यात  सुरुवात झाली आ हे.  मध्यरात्री 12.00 वाजता स्पर्धेची नियोजीत 8 तारीख सुरू होताच पिवंदळ, वारखेड, गाडेगाव, दानापूर, करी रुपागड, बोरव्हा, चिचारी इत्यादी गावांमध्ये जलसंवर्धनाच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. रात्रीची वेळ असुनही गावकऱ्यांनी एकजूटीचे प्रदर्शन करीत मोठ्या संख्येने या सार्वजनिक हिताच्या उपक्रमात हिरीरीने सहभाग घेतला.पहिल्याच दिवशी ओसांडून वाहणारा उत्साह पुढील 45 दिवस संपूर्ण गावकऱ्यांमधे जोश भरणारा नक्कीच असेल. त्यामुळे स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासूनच गावागावांमधे तुफान आल्याशिवाय राह...

सामान्य शेतकरी ते दुग्ध व्यवसायातील ब्रॅण्ड निर्माता...!

थेट येथील युवा शेतकऱ्यांचा प्रवास दुर्दम्य इच्छाशक्‍तीच्या बळावर असाध्य ही साध्य होते, हा विश्‍वास रुजविण्यात फाळेगाव थेट (ता. जि. वाशिम) येथील बालाजी कोरडे हा युवक यशस्वी झाला आहे. 10 वर्षापूर्वी दूधाळ जनावरांची खरेदी करीत हे दूध घरोघरी विक्री करण्याचा व्यवसाय त्यांनी सुरु केला. याच व्यवसायात सातत्य ठेवत त्यांनी पाकीटबंध दूधाचा प्रकल्प उभारला. त्यांचा हा आशावाद निश्‍चीतच विदर्भातील शेतीसाठी दिशादर्शक ठरणारा आहे. असे आहे फाळेगाव थेट वाशिम पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या फाळेगाव थेट या गावाची लोकसंख्या जेमतेम दोन हजारावर आहे. याच गावातील बालाजी व गणेश कोरडे या दोन भावंडांनी शेतीपूरक व्यवसायासाठी पुढाकार घेतला. कोरडे कुटूंबियांची सात एकर कोरडवाहू शेती. या शेतीत सोयाबीन, तूर यासारखी पावसावर अवलंबून असलेली पीक घेतली जातात. सोयाबीनची एकरी उत्पादकता 8 क्‍विंटल तर तुरीची एकरी 5 क्‍विंटल होत होती. कुटूंबाला आर्थिक सक्षम करण्याचा उद्देश ठेवत या दोन्ही भावंडांनी कोरडवाहू शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्याचा निर्णय घेतला. दहा वर्षांपूर्वी दहा म्हशी व दहा गाईंची खरेदी त्यांनी केली...