ऑईल फ्री भाजलेल्या वांग्याचे भरते आणते जीभेला चव आणि रूचकरपणास्वस्त आणि मस्त घरीच करा वांग्याचे भरते
वां गे फार सामान्य दिसणारी भाजी आहे. पण त्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही की वांगे हे हृदयासाठी आरोग्यदायी आहे. त्यामुळे कोलेस्ट्रालची मात्रा कमी होउन हृृदयासाठी उपकारी ठरतो. वांग्याचे सर्वात जास्त उत्पन्न हे चिनमध्ये होते तर दुसरा क्रमांक हा भारताचा लागतो. वांग्याचे वेगवेगळे प्रकार येतात. भरित करण्यासाठी मोठ्या वांग्याचा उपयोग करावा त्यामध्ये पांढरे आणि जांभळ्या रंगाचे प्रामुख्याने बाजारात मिळतात. वांग्याचे भरीत तर थोरामोठ्यांना आवडीचे आहे. त्यातही ते जर तेल न वापरता केले तर जे डायट करतात किंवा जास्त तेल खात नाहीत त्यांना तर फारच आवडेल. वांग्याचे भरीत हे खेड्यापासून तर शहराच्या स्वयंपाक घरापर्यंत मर्यादित राहीले नाही तर. आता फाईव्ह स्टार होटेलमध्येही त्याने आपली जागा घेतली आहे. तर बघुया कशी तयार केली जाते
वांग्याची रेसीपी.
सर्वप्रथम आपण साहित्य लिहून घेवूया, वांगे मोठे-दोन, कांदे बारीक केलेले-1, टोमॅटो बारीक केलेले-1 किंवा 2, लसून- 1 चमचा पेस्ट केलेले, हिरवी मिरची 1 किंवा 2, तिखटनुसार (मिर्च पावडर सुद्धा घेउ शकता), कोथींबिर कापलेली, नमक चवीनुसार.
वांगे चांगले धुवुन घ्या, वांग्यांना गॅसवर भाजण्यासाठी ठेवा त्यांना 3 ते 4 मिनिटांपर्यंत अलटून पलटून भाजा, (गावाकडे मातीच्या चुली असतात त्यामध्ये भाजलेले वांग्यांना आणखीन रूचकर चव येते जर आपल्याकडे चुल असेल तर चुलीतील जाळ जेव्हा लाल होतो त्याखाली वांगे आत ठेवा आणि त्यावर तो जाळ टाका हे करतांना सावधगिरी बाळगा कारण चुलीमध्ये वांगे जळून जाण्याची भिती जास्त असते) वांगे भाजल्यानंतर थंडे होउ द्या त्यांनतर त्याला साफ करा. पातेल्यात घेउन त्याला कुस्करा त्यामध्ये बारीक केलेला कांदा टाका, लसून पेस्ट टाका, त्यानंतर थोडे कापलेले टोमॅटो टाका, चवीनुसार
मिर्च पावडर किंवा हिरवी मिर्ची टाका, चवीनुसार मिठ टाकून त्याला मिक्स करूर घ्या आणि कापलेली कोथिंबीर टाकून प्लेट मध्ये घेवून भाकरी बरोबर आस्वाद घ्या तोंडाला रूचकर अशी चव लागेल. रोजच्या जेवनाव्यतिरिक्त तोंडाला नवीन चव येईल. मन तृप्त होईल.
Comments
Post a Comment