ईऽऽऽई चेहर्यावर मुरूम आता मी काय करू...! असा आवाज येतोच. चेहर्यावर मुरुम व पुटकळ्या येण्याची बरीच कारणे आहेत. वयात बदल होतात तेव्हा, तेलकट पदार्थाचे सेवन, उशीरापर्यंत जागरण करणे, त्वचा तेलकट असे अशी अनेक कारणे आहेत. त्यावर पुढे बघुया उपाय काय करता येतील.
का ळजी करू नका मुरूम/पुटकुळ्या प्रत्येकालाच होतात. त्यातही वाढत्या वयात हार्मोन्स बदलतात तेव्हा तर जास्त प्रमाणात दिसून येतात. चेहरा तेलकट होवून चेहर्यावर बारीक पेशींवर थर साचून त्या ब्लॉक होतात. त्यामुळे चेहर्यावर मुरूम/पुटकुळ्या तयार होतात.
त्यामुळे हे होउ नये यासाठी आपण केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधनांचा वापर करू नये. त्याचा विपरित परिणाम होउन चेहरा आणखी खराब होण्याची भिती असते.
आपल्याला एवढेच करायचे आहे की, चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवावा. झाल्यास एकदा बेसण पीठ घेवून चेहरा धुवावा. तसेच कोरफडच्या पानांतील गर काढून त्यानेसुद्धा आपला चेहरा स्वच्छ करता येतो. असेही घरगुती उपाय आपल्याला खर्च न येता करता येताता.
आरोग्यदायक आहार घ्यावा, पालेभाज्या, फळे, कडधान्ये खावीत. त्यासोबत व्यायाम करावा. यामुळे शरिरातील रक्तप्रवाह सुरळीत होउन त्वचेला तजेला येतो.
मुरम आल्यानंतर त्याला फोडू नका, त्यामुळे इन्फेक्शन होउन त्रास तर होतोच तेथे काळे डाग पडून चेहरा खराब होतो. जर चेहर्यावर जास्त मुरुम आले असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Comments
Post a Comment