Skip to main content

Posts

Showing posts from April 21, 2018

उन्हापासून बचाव

दररोज आपन पाहतो की  थोडे बाहेरून आले की आपल्याला उन्ह लागले म्हणतो. हे थोड्या प्रमाणात सहनही करतो.  पण त्याचे प्रमाण जास्त असले तर उष्माघात होउ शकतो. उन्हाचा तडाखा विदर्भात सर्वात जास्त असतो. म्हणून तेथेच उष्माघाताचे बळी पडणार असे नाही. इतरही भागात तापमान वाढले आहे. उन्हामुळे डोके दुखने, ओठ काेरडेे पडणे, अस्वस्त वाटायला लागणे. ही कारणे सुरु होतात.  उन्हाचा त्रास होउ नये म्हण्ून त्यावर उपाय करता येतात. उन्हात थंड पेय प्याले म्हणजे उन्ह लागणार नाही असेही होत नाही. त्याबरोबर आपला उन्हापासून बचावही करणे गरजेचे आहे. उन्हात बाहेर जायचे असल्यास डोक्यावर जाड रूमाल किवा उन्हापासून बचाव करणारी टोपी घालावी. उन्हाच्या बचावासाठी छत्रीचा वापर उन्हाळ्यात पण करावा शरीरावर शक्यतो सुती कपड्यांचा वापर करावा उन्हात कष्टाची कामे टाळावीत उन्हाच्या आधी म्हणजे सकाळीच आपली कामे करावीत भरपूर पाणी प्यावे. उष्माघाताची प्राथमिक लक्षणांमुळ सुरुवातीला थकवा व डोके गरगरल्यासारखे वाटते. जीव बैचैन झाल्यासारखा होतो. अशी प्राथमिक लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे जावे. याचे प्रमाण वाढत जाउन त्वचा कोरडी ...