दररोजची धावपळ, व्यवसायाचा ताण असे अनेक ना अनेक समस्या जगात असा एकही व्यक्ती नाही की ज्याला थोडा तरी मनावर ताण येत नाही. काही ना काही प्रमाणात ताण हा येतोच. हे काही काळ विसरायला लावणारे असे काही आहे का? जे नवी उर्जा घेउन परत येईल, हो नक्कीच आहे. ताण आहे म्हणूनच काय जायचं। आपल्या आनंदासाठी, कुटूंबासाठी किंवा एंजॉय करायला पण जायचं ना. गोवा नाव काढल्यावरच उत्साह वाढतो. डोळ्यासमोर उभा राहतो तो नयनम्य आणि अथांग असा समुद्र। मनाला प्रसन्न करणारं आल्हाददायक वातावरण. मनसोक्त बोटींग, पॅराग्लायडींग, बोंडला अभयारण्याची सफर, समुद्रातील लाटांवर स्वार होण्यासाठी, बीचवर पहूडण्यासाठी असे अनेक न एक फन अनुभवण्यासाठी गोव्याला तर जायलाच पाहिजे, पण या लोकप्रिय पर्यटन स्थळाबद्दल थोडीफार माहिती असली तर अजुनच फिरण्यास मजा येईल नाही. तर जाणून घेउ या! गोवा भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेले, ऐतिहासिक वास्तू असो की सागरी बीच हे मन प्रसन्न करून जाते. शरीराला आलेली मरगळ गोवा राज्यात प्रवेश करताच दूर होते. उंच उंच नाराळाचे झाडांनी व्यापलेला रस्ता, नदी आपले स्वाग...
नोकरी / रोजगार / Daily GK/ Mock test / Article/ टेक्नॉलॉजी