शेतीला शेतीपुरक व्यवसायाची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होते. एका तरुण शेतकऱ्याने भर उन्हाळ्यात राहत्या घरातील 10X10 च्या खोलीत मशरुमचे उत्पादन सुरु केले. केवळ एक महिन्यात त्याला 30 हजार रुपयाचा नफा झाला. त्यामुळे शेतकऱ्यासाठी मशरुम उत्पादन हा नवीन जोडधंदा बनू शकतो याचा राजमार्ग या शेतकऱ्याने दाखवला आहे. या शेतकऱ्याचे नाव आहे श्रीकृष्ण वायरे. देवळी तालुक्यातील 1350 डोकी असलेल्या नांदोरा या गावातील हा तरुण शेतकरी. घरी 9 एकर शेती असून यावर्षी शेतीतही त्याने भरघोस पीक घेतले. जानेवारी महिन्यात समन्वयित कृषी विकास प्रकल्प (केम) प्रकल्पामार्फत गावातच मशरुम उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेतलेल्या 25 शेतकऱ्यांपैकी श्रीकृष्ण वायरे यांनी दुसऱ्याच दिवशी घरातीलच एका खोलीत 400 बेड तयार केले. समन्वयित कृषी विकास प्रकल्प (केम) मार्फत त्यांना (स्पॉन) बीज पुरवठा करण्यात आला. मशरुमसाठी 27 डिग्री सेल्सियस तापमान राखावे लागते. त्यामुळे मार्च महिन्यात खोलीचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी वायरे यांनी 2 कुलरची व्यवस्था केली. मशरुमला दमट वाताव...
नोकरी / रोजगार / Daily GK/ Mock test / Article/ टेक्नॉलॉजी