सगळ्यात सोपा व्यायाम म्हणजे चालणे. चालण्याला कुठलेही पैसे मोजावे लागत नाही. दररोज 30 मिनिटे चालले तर नक्कीच आरोग्य चांगले राहते.
आज एकाच ठिकाणी बैठे काम करणे आणि धकाधकाची आयुष्य यामुळे अनेक रोगाना निमंत्रण आहेच. स्वत:कडे लक्ष देण्यासाठी कुणालाच वेळ नाही, शरिर स्वास्थ हिच खरी आपली संपत्ती आहे. तीला सांभाळणे आपली गरज नव्हे तर आवश्यक आहे. स्वास्थ चांगले तरच आपण कामे चांगले करू शकतो, कोणत्याही कामात यश संपादन करू शकतो. म्हणून स्वास्थ चांगले राहण्यासाठी सकाळचे 30 मिनिटे चालत रहा.
सकाळी चालण्याचे फायदे खुप आहेत. सकाळच्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते. हाडांसाठी आवश्यक असलेले डि जीवनसत्व हे सकाळच्या कोवळ्या उन्हातून आपल्याला मिळते. सकाळच्या वातावरणामुळे मन प्रसन्न राहते.
वजन कमी कराचे असेल तर चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे. चालण्याने आपल्या शरिरातील चरबीचे प्रमाण कमी होते. वेगात चालण्याचा फायदा हा आपल्या हृदयालाही होतो. चालण्याने पचनक्रिया सुधारते व मलबद्दधता, पोटाचे विकार कमी होतात. नियमित चालणार्यांमध्ये हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असते. चालण्याने पायांचे स्नायू मजबूत होतात. नियमित चालण्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते. जेवन केल्यावर लगेच बसू नये किंवा रात्रीचे जेवन झाल्या झाल्या झोपू नये, थोडीशी शतपावली जरून करावी.
चालण्याच्या व्यायामाला वयाचे बंधन नाही, हा कोणीही करू शकतो. यापासून तोटा काहीच नाही उलट फायदाच फायदा आहे. आपण बघितले असेल की कोणताही डॉक्टर पेशंटला सांगतो की चालत जा. त्याचे कारणही तसेच आहे. चालल्यामुळे शरिरातील अतिरिक्त कॅलरीज जळून स्थूलपणापासून आपल्याला वाचवते.

Comments
Post a Comment