Skip to main content

बागलांची ट्रॅक्टर ट्रॉली… झाली ‘पेटंट’ची हकदार


‘कॉमर्स ग्रॅज्युएट’ व्यक्तीने एखादा इंजिनिअरींग व्यवसाय करावा, हे आपण समजू शकू. पण अशा व्यक्तीने इंजिनिअरिंग विषयातील पेटंट मिळवावे, हे आश्चर्यकारकच ! धुळ्याच्या औद्योगिक वसाहतीत किसान इंजिनिअरिंग वर्क्स या नावाने शतीउपयोगी अवजारांच्या निर्मितीत रममाण झालेल्या प्रकाश यांनी ट्रॅक्टर ट्रेलरच्या ब्रेकिंग सिस्टिममध्ये पेटंट नोंदविले आहे. त्यांच्या आजवरच्या वाटचालीबद्दल…
ट्रॅक्टर चालविणे आणि त्याचे नियंत्रण ठेवणे हे मोठे अवघड काम. मुळातच हा अवजड आणि प्रचंड शक्ती असलेल्या यंत्राचा प्रकार, पाठीमागे लावलेल्या ट्रेलरमध्ये भरपूर माल भरुन जाणारे ट्रॅक्टर आपण नेहमीच पाहतो आणि भर वेगात असताना अचानक ब्रेक लावावा लागल्याने पलटी झालेल्या ट्रेलरची अवस्थाही आपण पहात असतो. असे अपघात टाळण्यासाठी सरकारने निर्णय घेत ट्रेलरला ब्रेक सिस्टिम बसविण्याचा आदेश काढला. ही गुंतागुंतीची प्रणाली धुळ्यातील किसान इंजिनिअरिंग वर्क्सचे प्रकाश बागल यांनी विकसित केली आणि त्याचे पेटंटही मिळविले. हे पेटंट सध्या सादर करण्यात आलेले असून त्याची सुयोग्य प्रक्रिया संपल्यानंतर ते रितसर प्रकाश यांच्या नावावर होईल, पण या पेटंटमुळे प्रकाश यांना यापुढे कायमस्वरुपी उत्पन्नाचा स्त्रोत मिळाला आहे. या पुढील काळात ज्या कुणा उत्पादकाला अशा प्रकारचे ब्रेकवाले ट्रेलर निर्माण करावयाचे असतील, त्यांनी प्रकाश यांना या सशोधनाची रॉयल्टी देणे किंवा त्यांच्याकडून ही उत्पादने विकत घेऊन आपल्या ट्रेलरला बसविणे आता आवश्यक ठरले आहे. बौद्धिक स्वामित्व हक्काचे हेच खरे वैशिष्ट्य आहे…!
अशा प्रकारचे पेटंट मिळविणारे प्रकाश बागल बालपणापासूनच वेगळा विचार करणारे. अत्यंत गरीबीत जन्मलेल्या प्रकाश यांचे बालपण खडतर असेच गेले. वडील गवंडीकाम करीत असत. आई काही कामे करीत त्यांना हातभार लावत असे. नारायण आणि लिलाबाई बागल या दाम्पत्याच्या पोटी प्रकाश यांचा जन्म 20 ऑक्टोबर, 1958 रोजी झाला. त्यांचा जन्म श्रीरामपुरात झाला. वडिलांचे वास्तव्य धुळ्यात असून ते गवंडीकाम करतात त्यातून मिळणारे उत्पन्न किती असणार ? त्यामुळे शाळेत असतानापासूनच त्यांनी छोटी-मोठी कामे करण्यास सुरवात केली. कधी चिवडा विकला, तर कधी कुल्फी… अशाच पद्धतीने शिक्षणासाठी चार पैसे कमावत त्यांनी 1975 मध्ये गरुड हायस्कुलमधून 42 टक्के गुण मिळवीत मॅट्रीकची परीक्षा दिली.
मॅट्रीकच्या परीक्षेनंतर खऱ्या अर्थाने प्रकाश यांच्या ‘करिअर’ला प्रारंभ झाला. सन 1978 मध्ये कॉमर्स हा‍ विषय घेऊन त्यांनी बारावीची परिक्षा दिली. या परीक्षेत त्यांना 52 टक्के गुण मिळाले. अकरावी-बारावीच्या काळात त्यांनी एका डॉक्टरकडे कंपाउंडरची नोकरी करीत आपल्या शिक्षणाचा पैसा उभा केला, शिक्षण कोणत्या शाखेतील घ्यायचे, या मागचे त्यांचे कारण मात्र वेगळेच होते. त्यांच्या एक महिला नातेवाईक राजकीय क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत होत्या. बी.कॉम केल्यास लगेचच बँकेत नोकरी मिळवून देता येईल, असे त्यांना सांगितल्याने तातडीच्या नोकरीसाठी प्रकाश यांना कॉमर्स शाखा निवडली. 1982 मध्ये विद्यावर्धिनी महाविद्यालयातून ते बी.कॉम. सुद्धा झाले. पण ‘ती’ नोकरी काही त्यांना मिळाली नाही. उदरनिर्वाहासाठी नोकरी करणे तरी गरजेचे होते. मग त्यांनी खाजगी नोकरीचा मार्ग पत्करला. स्वराज ट्रॅक्टचे डीलर असलेल्या भारत मशीनरीमध्ये त्यांनी वर्षभर सेल्समनची नोकरी केली. पुढे बाफना मोटर्समध्ये दोन वर्षे आणि खान्देश ट्रॅक्टर्समध्ये सात वर्षे काम करताना साधारण दशकभराचा ट्रॅक्टर विक्रीतील अनुभव मिळवीत त्यांनी या व्यवसायातील बारकावे शिकून घेतले याच काळात त्यांनी मार्केटिंग विषयातील डिप्लोमाही मिळविला.
नोकरीतील दहा वर्षांहून अधिक अनुभवानंतर आपण व्यवसायात उतरले पाहिजे असा विचार त्यांच्या मनात डोकावू लागला खरे तर या विचाराचे बीजारोपण आधीपासूनच सुरू झाले होते पण ते धाडस होत नव्हते एक मित्र सोबतीला आला. त्यांनी ठाम निर्धार करीत नोकरी सोडली आणि स्वतंत्र व्यवसायाला प्रारंभ केला हा व्यवसायही ट्रॅक्टरच्या क्षेत्रातीलच होता याच व्यवसायातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव त्यांना प्रेरणा देत होता खान्देश फार्मा इम्प्लिमेंटस या नावाने सुरू झालेल्या या व्यवसायात त्यांनी ट्रॅक्टरच्या ट्रेलरची एजन्सी घेऊन विक्री सुरू केली धुळ्यातच एक ट्रेलर निर्माते आधीपासून कार्यरत होते पण त्यांच्या वितरणाची बाजू कच्ची होती प्रकाश यांनी त्यांच्याशी चर्चा करून त्या ट्रेलरच्या मार्केटिंगची जबाबदारी स्वीकारली आधी वर्षभरातून साधारण 10-15 पर्यंतच असलेली त्यांची ट्रेलरची विक्री प्रकाश आणि त्यांच्या सहकाऱ्याने मिळून पहिल्या वर्षाअखेर थेट 80 पर्यंत नेली पुढच्या वर्षी ही संख्या 110 पर्यंत गेली आणि दुसऱ्या वर्षी त्यांनी 150 आकडा गाठला ट्रेलर वितरणातील नाडी त्यांच्या लक्षात आली होती अतिशय वेगाने ही विक्री चालू असतानाच संबंधित ट्रेलर निर्मात्यांनी चौथ्या वर्षी त्यांना ट्रेलर देण्यास नकार दिला या नकाराचे कारण त्याने सांगितले नाही. परिणामी प्रकाश आणि त्याच्या मित्रांचाही व्यवसाय बंद झाला.
या पार्श्वभूमीवर प्रकाश यांनी स्वतःच ट्रेलर निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच ट्रेलर बनवण्याचा उद्योग उभारायचा हे त्यांनी ठरविले पण त्यातील बारकावे कायदेशीर तरतुदी व परवाने यांची त्यांना माहिती नव्हती. या कामात त्यांच्या आरटीओ कार्यालयात यंदाचे काम करणारा एक मित्र मदतीसाठी आला आणि पुन्हा 1994 मध्ये किसान अॅग्रो इंडस्ट्रीची स्थापना झाली पण ही गोष्ट एका वाक्यात संपेल येवढी सोपी नव्हती यासाठी त्यांना बरेच कष्ट पडले.
अगदी प्रारंभी त्यांनी ट्रेलरच्या दोन डिझाइनची मंजुरी मुंबईहून मिळविली आता प्रत्यक्षात उद्योग सुरू करण्याची वेळ आली जवळ पैसा नव्हता यासाठी त्यांनी आपले जुने घर विकण्याचा निर्णय घेतला मधल्या 2-3 वर्षांच्या काळात 1992-93 दरम्यान त्यांनी फ्लॅट घेऊन नवे घर बांधले होते. जुन्या घराचा सौदा एक लाख रुपयात करून त्यातील 50 हजार रुपये देणे अॅडव्हान्स उचलले एमआयडीसीमध्ये त्यांनी एक शेड बाल्याने पाहून ठेवली होती. त्या मालकाला 10 हजार रुपये डिपॉझिट देऊन त्यांनी ही शेड ताब्यात घेतली उरलेल्या 40 हजारापैंकी 25 हजार रुपये किंमतीची ड्रिल मशीन 15 हजाराची रोख रक्कम आणि 10 हजाराच्या उधारीवर आणली. त्याच दरम्यान प्रकाश यांना पहिल्या ट्रेलरची ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर प्रत्यक्षात शिरपूर येथील आमदार अमरिश पटेल यांची होती प्रकाश याने 67 हजार रुपयात हा ट्रेलर त्यांना करून दिला पण यामुळे त्यांच्या हाती भांडवल आले या रकमेतून ट्रेलरसाठीचे चाकांचे मटेरियल त्यांना खरेदी करता आले. 26 जानेवारी 1994 रोजी सुरू झालेल्या त्यांच्या नव्या व्यवसायातील पहिले प्रॉडक्ट काही दिवसातच ग्राहकांपर्यंत पोहोचले. साधारण 67 हजारांत तयार होणारे ट्रेलर हे बाजारात 72 हजारात विकू लागले. पहिल्या दोन महिन्यांत रस्त्याने चक्क 30 ट्रेलरची विक्री केले यातून त्यांना आत्मविश्वास मिळाला आणि पैसेही हाती आले.
या कालावधीत व्यवसायाच्या त्यांच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या होत्या मार्केटचा अंदाज त्यांना आलेला होता स्वतंत्र व्यवसायाला नव्याने सुरुवात केल्यानंतर त्यांनी नव्या जोमाने नवनवीन उत्पादने बाजारात आणण्यास प्रारंभ केला अवजड वाहतुकीसाठी चार चाकी ट्रेलर अधिक क्षमता असलेले दोन चाकी ट्रेलर पल्टी नांगर हायड्रॉलिक ट्रेक पेरणी यंत्र कल्टीव्हेटर जमीन समतल करण्याचे यंत्र कपाशी पेरणी यंत्र ड्रॉवर बंपर उसाच्या शरीफ पाडण्याचे रेझर अशी अनेक नवनवीन उत्पादने त्यांनी अतिशय वेगाने बाजारात आणली 2009 मध्ये त्यांनी एक एक त्यांना फ्लॅट घेऊन येते व्यवसायाचा विस्तारही केला.
सन 2010 मध्ये त्यांच्या व्यावसायिक वाटचालीचे वेगळे वळण घेतले राहुरी आणि अकोला येथील कृषी विद्यापीठांनी पुढाकार घेत शेती अवजार उत्पादनाची एक परिषद बोलावली होती. या राज्यस्तरीय परिषदेत ॲग्री इम्प्लिमेंटस मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनची स्थापना झाली या संघटनेच्या पहिल्या अध्यक्षपदी प्रकाश बागल यांची नियुक्ती करण्यात आली. या घडामोडीनंतर त्यांचा कृषी विद्यापीठाची संपर्क वाढला या क्षेत्रातील नवनवीन पेटेंट यांच्याबद्दल माहिती त्यांना मिळत गेली. याच काळात पुण्यात कार्यरत असलेल्या ऑटोमोटिव रिचर्स असो सन ऑफ इंडिया या संस्थेच्या संपर्कात ते आले ट्रक्टरच्या ट्रॉलींना ब्रेक बसवण्यासंदर्भात तयार करावयाच्या प्रणालीची जबाबदारी या दरम्यान प्रकाश यांच्यावर टाकण्यात आली.
या निमित्ताने त्यांना पुण्यात जाण्याचा योग आला इथे या विषयाची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे जुन्या काही रस्त्यांच्या अवस्था वाईट म्हणावी अशी होती आणि ट्रॅक्टर हे प्रामुख्याने कच्च्या रस्त्यावरील वाहन गृहीत धरले जात होते काळ बदलतो आहे तसे रस्त्याचे रूप पालटले आहे ट्रॅक्टरमधील वाहतूक आता महामार्गावरही आली आहे. अशा स्थितीत ट्रॅक्टरची ब्रेकिंग सिस्टीम धोकादायक आहे ट्रॅक्टरला ब्रेक लावल्यानंतर फक्त ट्रॅक्टर मंत्री होते पण ट्रेलरवर त्याच्या अजिबात नियंत्रण नसते त्यामुळे भरधाव वेगातील ट्रॅक्टरने ब्रेक दाबल्यानंतर ट्रेलर पलटी होऊन झालेल्या अपघातांचे प्रमाण वाढते आहे यामुळे इतर वाहतुकी नाही धोका संभवतो अशा स्थितीत ट्रॅक्टरने ब्रेक दाबताच तो ब्रेक ट्रेलरलाही लागला पाहिजे अशी प्रणाली विकसित करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आणि त्यासाठी मुदतही घालून दिली. याच काळात भारत सरकारच्या कृषी यांत्रिकीकरणासाठी क्यूआरटी अर्थात पंचवार्षिक आढावा समितीवर सदस्य म्हणून प्रकाश यांची नियुक्ती झाली उद्योजकांचा प्रतिनिधी म्हणून ही नियुक्ती होती. या काळात प्रकाश यांचा ट्रॉली ब्रेकवर अभ्यास सुरू होता भारत सरकारने भोपाळ येथे स्थापलेल्या ट्रॅक्टर सिटी सेंटर नेत्यांना ब्रेक असलेल्या पाच ट्रॉलीची ऑर्डरही दिली त्या कामासाठी या विषयातील तरुणीही मदतीसाठी दिली हे तज्‍ज्ञ धुळ्यात मदतीसाठी आले आणि या कठोर मेहनतीतून ब्रेकवाले ट्रेलर तयार झाले.
हे ट्रेलर तयार होत असताना त्यात तंत्रज्ञानाने प्रकाश यांना या विषयाचे पेटंट नोंदवण्याचा सल्ला दिला त्यांच्यासाठी हा प्रकार नवा होता पण त्याचे महत्त्व समजताच प्रकाश यांनी त्यात पुढाकार घेतला आणि हे पेटंट रजिस्टरही केले हायड्रोलिक ऑपरेट वेल्बेक पद्धतीच्या तान्की केलेली ही पद्धती यापुढे ट्रॅक्टर आणि ट्रेलरमधील नियंत्रणाचे काम करणार आहे तयार झालेले हे तंत्रज्ञान ते आता इतर ट्रेलर निर्मात्यांना देण्यासाठी सज्ज आहेत पण आता त्यात नवे आर्थिक गणिते आली आहेत हे तंत्रज्ञान ज्यांना वापरायचे असेल त्यांनी प्रकाश यांना रॉयल्टी देणे गरजेचे असेल अर्थात प्रकाश यांनी यात वेगळाच मार्ग शोधला आहे त्यांनी संबंधित निर्मात्यांकडून डिपॉझिट घेण्याचा ठरवल्या सुचेनात त्यांना डिपॉजिट देतील त्यांना ते या ब्रेकच्या प्रणाली देतील आणि त्यांनी आपल्या उत्पादनात वापरावयाच्या आहेत अर्थात यामध्ये ही त्यांना काही अटी शर्तींचा समावेश केलेला आहे.
धुळ्यासारख्या शहरात राहणारा वाणिज्य शाखेची पदवी मिळविणाऱ्या आणि केवळ अनुभव व तर्क शास्राच्या आधारे नव्या विषयात संशोधन करणाऱ्या प्रकाश बागल यांनी या क्षेत्रात मिळविलेले यश अचंबित करणारे आहे सामान्य कृषी अवजार निर्माता ते पॅटर्न प्राप्त संशोधक ही त्यांची वाटचाल प्रेरक आहे आपल्या व्यवसायात हे यश मिळवत मिळताना त्यांचे सामाजिक भानही जागृत आहे. आपल्या उद्योगात त्यांनी मालक-नोकर भेद ठेवलेला नाही. त्यांच्या कंपनीत त्यांनी पी.एफ. कामगार विमा योजना आणि फॅक्टरी ॲक्टची अंमलबजावणी स्वत:हून केली आहे. ज्यात कामगारांचे भले आहे ते सारे करायचे, हे त्यांचे धोरणच आहे. अखिल भारतीय कृषि यंत्र उत्पादक महासंघाचे आता ते वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. लघुउद्योग भारती या उद्योगांच्या संघटनेचे ते सध्या धुळे जिल्हा अध्यक्ष आहेत. या आधी त्यांनी या संघटनेचे प्रांत अध्यक्षपद भूषविलेले आहे.
आपल्या वाटचालीत मयूर वाडीलाल शहा कमलकिशोर भंडारी हुकुम दास सेट आणि (कै.) रामकृष्ण पाटील यांची मोलाची मदत झाल्याचे ते सांगतात हे मदत नसती तर आपण उभे राहू शकलो नसतो असे ते आवर्जुन सांगतात. गुरुवर्य श्रीराम शर्मा महात्मा गांधी आणि गोळवलकर गुरुजी यांच्या आदर्श ते आपल्या डोळ्यासमोर ठेवतात इंग्रजीतून संवाद साधण्याचे ज्ञान कमकुवत असणे ही आपल्या वाटचालीतील मोठी अडचण असल्याची खंत व्यक्त करताना त्यांची दुसरी बाजू मात्र ते भक्कमपणे मानतात आयुष्यात आपण प्रत्येकाला समान मानतो प्रत्येक जण आपल्याला आयुष्यात कुठे ना कुठे उपयोगी पडतो यावर त्यांचा विश्वास आहे नव्या पिढीने जिद्द चिकाटी कष्ट आणि प्रामाणिकपणा बाळगला तर त्यांची प्रगती निश्चित आहे असे ते आवर्जून सांगतात हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत कारण याच सूत्राच्या आधारावर प्रकाश सेल्समनपासून पॅटर्न प्राप्त उद्योजक बनले आहेत.
संकलन - मनोहर पाटील
(सौजन्य :’महान्यूज’)

Comments

Popular posts from this blog

epaper web portal link

epaper.jagran.com epaper.bhaskar.com epaperlokmat.in epaper.esakal.com epaper.divyamarathi.com epaperthetimesofindi.com epaper.thehindu.com amarujala.com deshonnati.in loksatta.com newspaper.pudhari epunyanagari.com

कॉम्प्युटरवर काम तर बसण्याची स्थिती सुधारा

कॉम्प्युटर काम करताना बसण्याची पण काही वेळा पाळाव्यात. कारण एकाच जागेवर बसून कंबरदुखी, मानदुखने अशा समस्या सुरु होतात. प्रत्येक अर्धा ते एक तासांनी विश्राम घ्यावा. जेणेकरून शरिरास थोडी हालचाल होईल. आपले बसण्याचे आसन म्हणजेच खुर्ची हि बसायला कम्फर्ट आहे की नाही पाहावे, खुर्ची व्यस्थित नसेल तर कंबरदुखी, पाठदुखी सुरु होते. कॉम्प्युटर स्क्रिन आणि आपल्या डोळ्यांच्या एका रेषेत किंवा थोडासा खाली असावा. थोडा मानेचा व्यायाम करावा, जर आपण एखादा डाक्यूमंट किंवा पेपरवरुन टाईप करत असाल तर पेपर स्टँडचा वापर करावा. कि बोर्ड आणि आपल्या हाताला सोपा जाईल असा ठेवावा. वर किंवा खाली ठेवू नये.

मुलतानी माती

आज बाजाराध्ये अनेक फेसवॉश विक्रीसाठी आहेत. ते वापर केल्यावर चेहेरा लगेच उजळतो पण जास्त वापराने त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. निसर्गाने आपल्याला नैसर्गिकच सौदर्य प्रसाधने दिली आहेत. फक्त त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे माहित असणे आवश्यक आहे. मुलतानी मातीमधे शोषण्याचा नैसर्गिक गुणधर्म असल्याने प्राचिन काळात चेहर्‍यावर लावण्यासाठी उपयोगात आणली जात होती. तसा आजही त्याचा वापर होताना दिसून येतो. मुलतानी माती चेहर्‍यावर लावल्याने कोणताही साईडइफेक्ट न होता चेहरा कोमल होतो. मुलतानी माती लावल्यानंतर हळू-हळू घट्ट होउन ती कडक होते. ती चेहर्‍यावरील मृत कोशीका व अतिरिक्त तेलाला शोषून घेते. मुलतानी मातीचा फेसवॉश घरच्या घरी तयार करू शकतो. मुलतानी मातीचे 4 ते 5 चमचे त्यामध्ये दही 2 चमचे, लिंबू रस अर्धा चमचा, थोडीशी हळद यांचे मिश्रण करून 20 ते 25 मिनिटांपर्यंत ठेवा, नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून स्वच्छ करा. खासकरून ज्यांचा चेहरा तेलकट आहे त्यांचासाठी तर हा अनोखा उपचारच आहेत. तेलकट चेहर्‍यावरील तेल शोषून स्वच्छ करतो. त्याचबरोबर चेहर्‍यावरील मुरूम, पुटकुळ्यांपासूनही सुटका मिळते. अशा या मुलतानी...