आज प्रत्येकालाच सर्वात पुढे जायचे आहे! त्यामुळे प्रत्येक जणंच एकमेकांच्या पुढे धावत आहे. त्यामुळे टेंशन, आहाराचा अभाव, व्यायाम अशा शरिराला आवश्यक असणार्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आपले आरोग्य बिघडून आजारांना आमंत्रण देतो. आरोग्य सुदृढ राहावे म्हणून त्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
आ जार कोणताही असो, तो पूर्वीच ओळखून आपण त्याला नियंत्रणात आणू शकतो. त्याची लक्षणे ओळखून डॉक्टरांकडून योग्य उपचार करून तो कायमचा घालवू किंवा त्याची तीव्रता कमी करू शकतो. असाच आजार आहे मायग्रेन. यामध्ये असह्य अशी डोकेदुखी होते. मायग्रेनमध्ये थोड्या थोड्या वेळाने डोक्याच्या एका बाजूने असह्य अशा वेदना होतात. त्या काही तासांपासून ते दोन-तीन दिवसापर्यंतही राहू शकतात. यामध्ये आवाज, तीव्र प्रकाश सहन होत नाही, चक्कर येतात, उलट्या होतात, अशक्तपणा, एकच प्रतिमा तीन-तीन दिसतात. ही लक्षणे मायग्रेनची असू शकतात. असे झाल्यास त्वरीत डॉक्टरला दाखवावे. याची टाळा-टाळ केल्यास ब्रेन हॅमरेजचा धोका संभवू शकतो.
ज्यांना शुगर, ब्लडप्रेशर आणि जे नेहमी मानसिक तनावामध्ये असतात अशांना मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे याची काळजी घेणे आवश्यक असते. त्यासाठी उपाशी पोटी राहू नका, वेळेवर जेवन करा, भरपूर प्रमाणात पाणी प्या, हिरव्या भाज्या खा, चांगली झोप घ्या.
मायग्रेनचा त्रास असताना डोक्यावर थंड्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्याने थोडा आराम होतो. नियमितपणे योग साधना करा यामुळे आपल्या मेंदूवरील ताण-तणाव दूर करण्यास मदत करतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मायग्रेनमध्ये डोक्याला रक्तपुरवठा करणार्या धमण्यांमध्ये जेव्हा एखाद्या ठिकाणी रक्तप्रवाह थांबतो तेव्हा तेथे दबाव निर्माण होवून तेथे धमण्या फुगायला सुरु होतात. त्यामुळे तेथे वेदना होतात. त्या कमी जास्त प्रमाणातही असू शकतात.
मायगे्रनचा त्रास पूर्ण/अर्धे डोक्याच्या कोणत्याही भागात याचा होवू शकतो.
डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय कोणतीही औषधे घेवू नका
लख्ख प्रकाशाकडे पाहू नका, उन्हात जाताना टोपी घाला
जास्त वेळ टिव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल पाहू नका.
उंच इमारत, किंवा कोणतीही उंच जागेवरून खाली पाहू नका
जास्त सुगंधित तेल, बॉडी स्प्रेचा वापर करू नका
मायग्रेनचा त्रास असणार्यांनी नेहमी आनंदी राहावे. ताण-तणावापासून मुक्त असावे, नेहमी मित्र परिवार यांच्यात वेळ द्यावा.
(या लेखाशी लेखक सहमत असतील असे नाही कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्लयानेच घ्यावे)आ जार कोणताही असो, तो पूर्वीच ओळखून आपण त्याला नियंत्रणात आणू शकतो. त्याची लक्षणे ओळखून डॉक्टरांकडून योग्य उपचार करून तो कायमचा घालवू किंवा त्याची तीव्रता कमी करू शकतो. असाच आजार आहे मायग्रेन. यामध्ये असह्य अशी डोकेदुखी होते. मायग्रेनमध्ये थोड्या थोड्या वेळाने डोक्याच्या एका बाजूने असह्य अशा वेदना होतात. त्या काही तासांपासून ते दोन-तीन दिवसापर्यंतही राहू शकतात. यामध्ये आवाज, तीव्र प्रकाश सहन होत नाही, चक्कर येतात, उलट्या होतात, अशक्तपणा, एकच प्रतिमा तीन-तीन दिसतात. ही लक्षणे मायग्रेनची असू शकतात. असे झाल्यास त्वरीत डॉक्टरला दाखवावे. याची टाळा-टाळ केल्यास ब्रेन हॅमरेजचा धोका संभवू शकतो.
ज्यांना शुगर, ब्लडप्रेशर आणि जे नेहमी मानसिक तनावामध्ये असतात अशांना मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे याची काळजी घेणे आवश्यक असते. त्यासाठी उपाशी पोटी राहू नका, वेळेवर जेवन करा, भरपूर प्रमाणात पाणी प्या, हिरव्या भाज्या खा, चांगली झोप घ्या.
मायग्रेनचा त्रास असताना डोक्यावर थंड्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्याने थोडा आराम होतो. नियमितपणे योग साधना करा यामुळे आपल्या मेंदूवरील ताण-तणाव दूर करण्यास मदत करतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मायग्रेनमध्ये डोक्याला रक्तपुरवठा करणार्या धमण्यांमध्ये जेव्हा एखाद्या ठिकाणी रक्तप्रवाह थांबतो तेव्हा तेथे दबाव निर्माण होवून तेथे धमण्या फुगायला सुरु होतात. त्यामुळे तेथे वेदना होतात. त्या कमी जास्त प्रमाणातही असू शकतात.
मायगे्रनचा त्रास पूर्ण/अर्धे डोक्याच्या कोणत्याही भागात याचा होवू शकतो.
डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय कोणतीही औषधे घेवू नका
लख्ख प्रकाशाकडे पाहू नका, उन्हात जाताना टोपी घाला
जास्त वेळ टिव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल पाहू नका.
उंच इमारत, किंवा कोणतीही उंच जागेवरून खाली पाहू नका
जास्त सुगंधित तेल, बॉडी स्प्रेचा वापर करू नका
मायग्रेनचा त्रास असणार्यांनी नेहमी आनंदी राहावे. ताण-तणावापासून मुक्त असावे, नेहमी मित्र परिवार यांच्यात वेळ द्यावा.

Comments
Post a Comment