ताप हा तसाही तापदायक असतोच, पण सामान्य ताप लवकर बरा होतो. काही ताप असे असतात की ते लवकर बरे होण्यासाठी खूप वेळ घेतात. तसाच ताप आहे डेंग्यू. या तापामुळे आपल्या शरिरात त्राण राहत नाही. हा ताप आपल्याला होउ नये म्हणून याची काळजी घेतलेली बरी...!
डें ग्यूमुळे देशात मृत्यू होणार्यांची संख्या फार मोठी आहे. डेंग्यू हा डासांपासून संक्रमित होणारा रोग आहे. आपल्याला याला दूर ठेवता येवू शकते. फक्त हवी डेंग्यू बद्दल जागरूकता आणि गरज आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जेणे करून तेथे डासांची उत्पत्ती होणार नाही.
डेंग्यू हा हवा, पाणी किंवा सोबत राहिल्याने किंवा सोबत जवेण केल्याने होत नाही, तर डेंग्यू अशवशी रशसूिींळ नावाच्या मादी डासांपासून होतो. जर एखाद्याला डेंग्यू झालेला असेल त्याला हा डास चावला तर त्याद्वारे डेंग्यू संक्रमित रक्त त्या डासाच्या शरिरात जाते आणि जेव्हा हा डेंग्यू संक्रमित डास निरोगी व्यक्तीला चावते तेव्हा त्याच्या शरिरात या डेंग्यूचे संक्रमण होते आणि त्या व्यक्तीला डेंग्यू होतो.
हे डास दिवसा चावतात. या डासांच्या पायावर आणि शरिरावर पांढर्या रंगाचे पट्टे असतात. हे डास जास्त उंच उडू शकत नाहीत. हे घरातील साठवलेले पाणी, कुलरच्या टपातील पाण्यात, टायरमध्ये साचलेले पाणी, छतावरील भांड्यातील पाण्यात राहून प्रजनन आणि पैदास करतात.
यातील पाणी आटले तरी डासांची अंडी 10 ते 12 महिने सुरक्षित रातात.
डेंग्यूचा डास चावल्यानंतर 4 ते 8 दिवसानंतर डेंग्यू तापाची लक्षण दिसू लागतात. यामध्ये
खूप थंडी आणि ताप येतो, सर्दी होते, डोळयांना वेदना होतात, पायात गाठी आल्यासारखे वाटते, अंग जोरात दुखते, भूक मंदावते, मळमळ होते. यावर उपाय म्हणजे डेंग्यूच्या तापाची काळजी घेणे.
हा संक्रमित रोग असल्याने त्याला थांबवने शक्य होत नाही. कारण तो डासांद्वारे होतो एकाकडून दुसर्याकडे जातो. म्हणून त्याचा प्रतिबंद करणे हाच उपाय आहे.
डेंग्यूच्या तापाचे लक्षण दिसल्यावर त्यावर उपचार केल्या तातात. डेंग्यू झालेल्या रूग्णाला नियमित आहार, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेतली पाहिजेत. डेंग्यूबाधित रूग्णाला भरपूर पाणी प्यायला हवे.डॉक्टरांच्या सल्ल्याने झश्ररींशश्रशीं र्लेीपीं चेक करून घ्याव्यात.
रोगांपासून बचाव करण्यासाठी आपली प्रतिकार शक्ती सक्षम असते. त्यासाठी आपल्याला आरोग्यदायक आहार आणि व्यायामाद्वारे तीला वाढवण्याचे प्रयत्न करावे.

Comments
Post a Comment