आपल्याकडे देवाला तांब्याच्या भांड्यातील पाण्याने अंघोळ घातली जाते. हे खूप पूर्वीपासून चालत आलेले आहे. त्याचा विचार केला असता त्यात सायंटीफीक कारण दडलेले आहे, हे नक्कीच आहे.
प्रत्येक क्षेत्रात जशा जुन्या वस्तू जाउन नवीन वस्तू येतात तशाच आपल्या घरात देखिल नवीन वस्तू आल्या आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर ब्लॅक अँड टिव्ही घ्या त्या जागी आता कलर टिव्ही, नंतर एलइडी, थ्रीडी टिव्ही आला. तसेच आपल्या किचनमधील जुनी भांडी सुद्धा बदलली. पूर्वी काही मातीची, काही पितळ,कासे, तांब्याची होती. त्याची जागा आता स्टेनलेस स्टिल, काचेची आता तर चक्क प्लास्टिकची भांडी आलेली आहेत. स्वस्त आणि दिसायला चांगली असल्याने प्रत्येक ठिकाणी यांचा वापर दिसतो.
पूर्वी जुन्या जानत्या लोकांनी प्रत्येक भांड्याचा शरिराला होणारा फायदा बघून त्याचा वापर आपल्या किचनमध्ये केला असावा म्हणूनच जुन्या भांड्यांमध्ये नैसर्गिक गुणधर्म आढळतो. ज्याचा फायदा आपल्या शरिराला होतो. म्हणून काही वस्तू ह्या काळ बदलला तरी त्यांची जागा कायम राहायला हवी. पूर्वी औषधी कारखाने, डॉक्टर, मेडीकल नसायची सर्वकाही घरगुती किंवा आयुर्वेदीक जडी-बुटी, नैसर्गिक वनस्पती यांचेच औषध असायचे. त्यातूनच एक घरगुती औषध हे आहे. तांब्यामध्ये असलेले बॅक्टिरीया नाशक गुणधर्मामुळे त्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर पाणी ठेवून ते सकाळी प्यावे.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पोटाच्या विकारांवरही गुणकारी आहे. जसे पोटदुखी, गॅस, अॅसिडिटी यांना आराम देते.
रोज सकाळी यातील पाणी पिल्याने चेहर्यावरिल मुरूम, पुटकुळ्या येउ देत नाही आणि चेहरा चमकदार होतो. आपल्या त्वचे सबंधी समस्या ह्यामुळे दूर राहतात. पोटाचे विकारही यापपासून बर्याच प्रमाणात दूर होतात. तांब्याच्या भांड्यातील पाण्यामुळे हृदयालाही फायदा होतो. आपल्या शरिरात तयार होणार्या बॅक्टिरियाला हे नष्ट करुन आपले आरोग्य सुधारण्यास मदत करतो.

Comments
Post a Comment