प्रत्येकाला वाटते की आपल्या चेहर्यावर नेहमीच तेज असावे, आपण सगळ्यांत उठून दिसले पाहीजे. यासाठी आपण नेहमीच सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी रासायनिक क्रीमचा अतीवापराने आपल्या चेहर्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यासाठीच काही घरचेच उपाय करूया.चे हर्याला चमकण्यासाठी दिवसातून दोन वेळा चेहरा पाण्याने स्वच्छ करा. शक्यतो केमिकलचा वापर कमी करा. पाण्याच्या गुळण्या करा. त्यामुळे चेहर्याचा व्यायाम होतो.
जास्तीत जास्त पाणी प्या, पाण्याने आपल्या शरीरातील हानीकारक घटक घामाद्वारे बाहेर फेकल्याने त्वचा स्वस्थ राहते. दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी प्या. आपल्या चेहर्याला सूर्यकिरणांपासून वाचवा, त्यामुळे चेहर्यावर मुरूम, पुटकुळ्या, डोळ्याच्या खाली काळे डाग पडतात. जर आपल्याला बाहेर जायचेच असेल तर, चेहर्याला रूमाल बांधा, सनस्क्रीम, हेल्मेटचा वापर करा.
दर रोज चंदन पावडर, गुलाब जल व हळद यांचे मिश्रणाचा लेप तयार करुन चेहर्यावर लावावा त्यामुळे चेहर्यावरचा ग्लो वाढले. चेहर्यावरील काळ्या डागांसाठी कोरफळ अतिशय गुणकारी माणले जाते. कोरफळच्या पत्त्यांच्या आतील गर काढून काळ्या डागांवर लावावा त्यामुळे काही दिवसांत तुम्हाला फरक दिसेल.
तसेच टोमॅटोचा रस काढून त्यात थोडेसे शहद टाकून हलक्या हाताने चेहर्याचे मसाज करावे, असे नियमित केल्याने चहरा चमकेल. चेहर्यावरील तेजासाठी नेहमीच मौसमी फळे खावीत जसे संत्री, पेरु, आंबे अशाप्रकारची मौसमी फळांचे सेवन करावे.
Comments
Post a Comment