प्रत्येक ऋृतू बदलला की, वातावरणात बदल होतो.त्याचा परिणाम लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना होतो. त्यात लहान मुलांची जास्त काळजी घ्यायची गरज असते. तर बघुया अतिसार (डायरिया) काय आहे.
अ तिसार (डायरिया) यात शरिरातील पाणी आणि मिनरल निघून गेल्याने पोषण मिळत नाही. हा खाण्या पिण्याच्या पदार्थामधून शक्यतो होतो. प्रदूषित पाणी, फळे, अन्न हे याचे मुख्य कारण आहेत. अन्नाच्या किंवा पाण्याच्या यामाध्यमातून पोटात बॅक्टिरिया (जिवाणू)गेल्यावर त्याचे परिणाम दिसायला लागतात. या व्यतिरिक्तही अतिसाराची कारणे आहेत. जसे भेसळयुक्त दूध, दुग्धजन्य पदार्थ, कमी झोप. पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे अतिसार झाल्याचे प्रमाण जात असतेे.
डायरियाची सुरुवात पोटात थोडे दुखणे सुरु होते नंतर त्याचे प्रमाण वाढते. संडास कधी घट्ट तर कधी पातळ होते. हात पाय दुखायला लागतात. अशक्तपणा येतो. मळमळ, उलट्या होतात. यामुळे शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होवून मृत्यू सुद्धा होउ शकतो.
लहान मुलांना पाच पाच मिनिटांतून पातळ संडास होते. त्यामुळे त्यांच्या शरिरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. म्हणून त्यांची काळजी घ्यावी, ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
डायरियाची काळजी घेताना शिळे अन्न, तेलकट, पचायला जड, जास्त मसाल्याचे पदार्थ, उघड्यावरील पदार्थ, दूषित पाणी हे टाळा. ताजे अन्न खा. आपल्या आजूबाजूला स्वच्छता राखा, नखे वाढवू नका, आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
डायरियात हलके अन्न खावे. भात, मोसमी फळे खावीत. दूध व दूधजन्य पदार्थ शक्यतो टाळावी डायरित ती पाचायला जड असतात. यामध्ये शरिराला आरामाची खुप आवश्यकता असते. त्यामुळे आराम करावा.
डायरियाचे तीन प्रकार आहेत : 1. व्हायरल 2 बॅक्टीरिअल 3 प्रोटोजोअल व्हायरल हा सामान्य असतो, तर बैक्टीरिअल हा बॅक्टीरिपासून तर प्रोटोजोअल हा अमिबापासून होतो. बॅक्टीरिया आणि प्रोटोजोअल हे दोन खुप घातक असतात. यावर उपाय केला नाही तर यापासून मृत्यू सुद्धा होउ शकतो.
अतिसार असताना हे करा...!
हलके अन्न खा
मोसमी फळे खा
उकळलेले पाणी प्या
हात स्वच्छ धुवा
तळलेले अन्न टाळा
मांस/जड अन्न टाळा
अल्कोहोल टाळा
अतिसाराचे प्रमाण जास्त असेल तर लवकर डॉक्टरांकडे जावे. त्यावर उपचार न केल्यास मृत्यू सुद्धा होउ शकतो

Comments
Post a Comment